‘श्रीरामचरितमानस’चा अवमान करणारे बिहारचे मंत्री चंद्रशेखर आणि उत्तरप्रदेशचे समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांना तात्काळ अटक करा !
प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनामध्ये हिंदुत्वनिष्ठांची मागणी
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी ‘संत तुलसीदास रचित ‘श्रीरामचरितमानस’ याला द्वेष पसरवणारा ग्रंथ म्हटले’, तर उत्तरप्रदेशचे समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘श्रीरामचरितमानस’च्या चौपाईवर (दोह्यावर) प्रतिबंध घालण्याची मागणी करतांना हा ग्रंथ कह्यात घेऊन त्याला नष्ट केले पाहिजे’, असे संतापजनक वक्तव्य केले आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तात्काळ गुन्हे नोंदवून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’त करण्यात आली. येथे चालू असलेल्या माघ मेळ्यात २५ जानेवारी या दिवशी हे आंदोलन करण्यात आले. या वेळी विश्व हिंदु परिषद, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद, जांबाज हिंदुस्थानी सेवा समिती, अक्षय युवा फाऊंडेशन, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आदी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
आंदोलनात करण्यात आलेल्या अन्य मागण्या
१. प्रभु श्रीरामाचा अवमान करणार्या प्रा. के.एस्.भगवान यांना देण्यात आलेला जामीन रहित करण्यात यावा.
२. केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर ‘ईशनिंदाविरोधी कायदा’ करावा.