दातांच्या मुळांशी जमा झालेला मळ जात नसल्यास एकदा दंतवैद्यांकडे जाऊन दात स्वच्छ करून घ्यावेत !
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १४४
‘नियमित दात नीट न घासल्याने पांढरट किंवा पिवळट आडव्या रेषा दातांच्या मुळांशी दिसू लागतात. हा दातांच्या मुळांशी जमलेला मळ असतो. पुष्कळ दिवस हा मळ दातांच्या मुळांशी राहिल्यास दातांची मुळे सैल होऊ शकतात. हिरड्या नाजूक होऊन दात घासतांना हिरड्यांमधून रक्त येऊ शकते. दात निरोगी रहाण्यासाठी दातांच्या मुळांशी असलेला हा मळ काढावा लागतो; परंतु दात ब्रशने घासून हा मळ निघत नाही. त्यामुळे एकदा दंतवैद्यांकडे जाऊन आपले दात तपासून घ्यावेत आणि त्यांच्या सल्ल्यानुसार दात स्वच्छ करून घ्यावेत. त्यानंतर पुन्हा मळ साचू नये, यासाठी प्रत्येक वेळा खाल्ल्यावर दात स्वच्छ धुवावेत.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१.२०२३)
संपर्क : आपले अनुभव ayurved.sevak@gmail.com वर कळवा