सातारा येथे समर्थ रामदासस्वामी पादुका पूजन सोहळा !
सातारा, २९ जानेवारी (वार्ता.) – शहरातील रामाचा गोट येथील भटजी महाराज मठाजवळील दक्षिणमुखी राघव मारुति मंदिरात राष्ट्रसंत समर्थ रामदासस्वामी यांच्या पादुकांचा पूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ३० जानेवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता समर्थभक्तांच्या वंदनीय उपस्थितीमध्ये हा सोहळा होणार आहे. १५ फेब्रुवारी या दिवशी दासनवमी असून यानिमित्त धर्मदान आणि शिधा गोळा करण्याची सेवा चालू आहे. ज्या समर्थभक्तांना धर्मदान आणि शिधा दान द्यावयाचा आहे, त्यांनी मंदिरातच तो जमा करायचा आहे, तसेच अधिकाधिक समर्थभक्तांनी पादुका दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.