रत्नागिरी येथील सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला श्रीधर खेर (वय ९१ वर्षे) यांचा देहत्याग !
रत्नागिरी, २९ जानेवारी (वार्ता.) – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा आणि ‘गुरु हेच अवघे विश्व’ असणार्या येथील सनातनच्या ५४ व्या संत पू. मंगला श्रीधर खेर (वय ९१ वर्षे) यांनी २९ जानेवारीच्या पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी देहत्याग केला. त्यांच्यावर सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.
पू. खेरआजी वर्ष १९९८ पासून सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत होत्या. त्यांनी १३ सप्टेंबर २०१५ या दिवशी संतपद प्राप्त केले. त्यांनी त्यांच्या मुलांवर केलेल्या उत्तम संस्कारांमुळे त्यांचा परिवारही सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधनारत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा श्री. मिलिंद खेर, सून सौ. मीनल खेर, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या परिवारातील अनेक जणांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा टप्पा गाठला आहे.
‘प.पू. डॉक्टर सर्व काही करत आहेत. त्यामुळे आपल्याला कसलीच काळजी नाही. स्वभावदोष निर्मूलनासाठी प्रयत्न केला, तरच आपली प्रगती होणार आहे. नामस्मरण करत सेवा केल्यास आनंद मिळतो. नामस्मरणाने पुष्कळ लाभ होतो. मन निर्विचार रहाते. मनातील विकल्प निघून जातात’, असे त्या साधकांना मार्गदर्शन करत असत.