केवळ भ्रमणभाषवर संपर्क करून विज्ञापने आणि अर्पण मिळवण्याची सेवा करता येते, याची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने जाणीव होणे
१. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने वर्ष १९९९ पासून विविध राज्यांत प्रत्यक्ष जाऊन विज्ञापने आणि अर्पण मिळवणे अन् ‘कोरोना’च्या काळात आश्रमांत राहून अर्पण मिळवण्याची सेवा करता येणे : ‘वर्ष १९९९ पासून मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने संपर्क करणे, विज्ञापने आणि अर्पण मिळवणे, या सेवा करत आहे. त्या वेळी महाराष्ट्रात, तसेच दक्षिण भारत, उत्तर भारत, झारखंड आणि राजस्थान येथे माझ्या सेवेच्या दौर्यांचे नियोजन असाायचे. कोरोनामुळे २०२० ते २०२२ या वर्षांतील काही मास मी आश्रमांत राहून सेवा केली. या कालावधीत २०२१ आणि २०२२ चे पंचांग अन् ग्रंथ यांसाठी विज्ञापने घेणे, नियतकालिकांसाठी विज्ञापने घेणे आणि वह्यांचे वितरण करणे, या सेवा मी करू लागले. या कालावधीत आश्रमासाठी लागणारे साहित्य अर्पण म्हणून मिळवणे आणि प्रसार करणे या सेवा गुरुदेवांच्या कृपेने मला करता आल्या.
२. विविध वस्तूंची खरेदी करतांना व्यक्तींची प्रत्यक्ष भेट न घेताही सर्व व्यवहार सुरळीत होणे आणि त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने ‘कर्तेपणा’ या अहंच्या पैलूची जाणीव होणे : या वर्षी काही वस्तू खरेदी करायच्या होत्या. त्या वेळी मी केवळ भ्रमणभाषवर संपर्क करूनही सर्व व्यवहार झाले. संबंधित व्यक्तींना मी कधीही भेटले नव्हते, तरी त्यांनी मागणीनुसार साहित्य पाठवले. त्या वेळी माझ्या लक्षात आले की, ‘हे सर्व गुरुदेवांनीच केले. हे त्यांचेच नियोजन होते. त्यांनी मला माध्यम बनवून या सेवा करवून घेतल्या.’ मी या प्रसंगांचे चिंतन आणि अभ्यास केला असता ‘गुरुदेवांनी ‘कर्तेपणा’ या माझ्या अहंच्या पैलूची मला जाणीव करून दिली आणि तो घालवण्यासाठी या सेवेची संधी दिली.
यावरून ‘गुरुदेवांना माझी साधना आणि प्रगती यांची किती काळजी आहे’, ते लक्षात आले. इतकी वर्षे संपर्क करणे, अर्पण आणि विज्ञापने मिळवणे, या सेवा केल्याने माझ्यात सूक्ष्म अहं निर्माण झाला होता. तो नष्ट होण्यासाठी गुरुदेवांनी या सेवांच्या माध्यमातून माझ्याकडून प्रयत्न करून घेतले. यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
३. अन्य राज्यांमध्ये न जाताही ‘पंचांग’ आणि ‘जीवनदर्शन’ पुस्तिका यांसाठी विज्ञापने मिळाल्यावर ‘परात्पर गुरु डॉक्टरच सर्व करतात’, याची जाणीव होणे : वर्ष २०२० ते २०२२ या कालावधीत कोरोनामुळे अन्य राज्यांमध्ये न जाताही सर्व भाषांतील ‘पंचांग’ आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ ही पुस्तिका यांसाठी विज्ञापने मिळाली अन् त्यांची वेळेवर छपाईही करता आली. त्या वेळी ‘मी काहीच करत नाही, गुरुदेवच सर्व करतात’, याची जाणीव गुरुदेवांच्या कृपेमुळे झाली.’
– श्रीमती स्मिता नवलकर (वय ७१ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६० टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.६.२०२२)
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा आणि भाव यांमुळे विज्ञापने मिळवण्याची सेवा तळमळीने करणारे कर्नाटक राज्यातील साधक !
‘वर्ष २००० पासून इतर राज्यांमध्ये, तसेच अन्य साधकांच्या समवेत मी सेवेला गेल्यावर मला त्यांच्याकडून पुष्कळ शिकायला मिळाले. आता सर्वत्रचे साधक विज्ञापने मिळवण्यासाठी प्रयत्न करत असून ते ‘पंचांग’ आणि ‘सनातन प्रभात’ यांसाठी विज्ञापने घेत आहेत. कर्नाटक राज्यातील साधकांनी ही सेवा लवकर शिकून चांगले प्रयत्न केले. तेथील साधकांची गुरुदेवांवर श्रद्धा आणि भाव असल्यामुळे त्यांना कन्नड पंचांग अन् साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ यांसाठी विज्ञापने मिळत आहेत. साधकांकडून ‘कन्नड भाषेतील दक्षिण आणि उत्तर आवृत्ती यांच्यासाठी ‘पंचांग’, तसेच ‘सनातन प्रभात’ यांसाठी सर्व विज्ञापने मिळवण्याची सेवा मार्च अखेरपर्यंत पूर्ण होते’, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. कर्नाटकातील साधकांकडून श्रद्धा, भाव आणि तळमळ या गोष्टी मला शिकायला मिळाल्या.
‘त्यांच्यातील भाव आणि तळमळ माझ्यामध्येही येऊ दे’, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना करते.
– श्रीमती स्मिता नवलकर (वय ७१ वर्षे) (१०.६.२०२२)