(म्हणे) ‘शुक्रवारच्या नमाजानंतर संपूर्ण शहराला आग लावू !’ – इंदूर येथील धर्मांध मुसलमान

मध्यप्रदेशच्या इंदूर येथील धर्मांध मुसलमानांकडून धमकी

हिंदूंना म्हटले ‘डुक्कर’!

इंदूर (मध्यप्रदेश) – येथे काही धर्मांध मुसलमानांनी हिंदूंच्या विरोधात घोषणाबाजी केल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. ‘सर तन से जुदा’ (शीर धडापासून वेगळे करणे) नावाच्या टोळीने या घोषणा दिल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये ‘संपूर्ण इंदूर शहराला आग लावू’, असे एक मुसलमान म्हणतांना दिसत आहे, तर अन्य एक जण ‘हे कृत्य शुक्रवारची नमाज झाल्यावर करण्यात येईल’, असे म्हणत आहे. उपस्थित मुसलमान त्यांच्या वक्तव्यांचे समर्थन करत असल्याचे आणि हिंदूंना ‘डुक्कर’ संबोधत असल्याचेही यात दिसत आहे.

यासंदर्भात विश्‍व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बंसल यांनी एक व्हिडिओ ट्वीट करून संबंधितांना अटक करण्याची मागणी केली आहे. ट्वीटमध्ये बंसल यांनी राज्याचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांना ‘टॅग’ करून (उद्देशून) संबंधित लोकांच्या विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी संबंधित व्हिडिओची नोंद घेतली असून दोघा मुसलमानांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. दोघेही फरार असून एकजण राजस्थानच्या अजमेर येथे, तर दुसरा मध्यप्रदेशातील रतलाम येथे असल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण ?

शाहरूख खान यांच्या ‘पठान’ चित्रपटाच्या विरोधात २५ जानेवारी या दिवशी इंदूर येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध प्रदर्शन केले होते. तेव्हा एका हिंदूने महंमद पैगंबर यांच्या विरोधात कथित घोषणा दिल्याचा आरोप करत स्थानिक मुसलमानांनी पोलिसांत तक्रार केली होती. त्यावरून ७ हिंदुत्वनिष्ठांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी राज्यभरात मुसलमानांनी हिंसक आंदोलने केली होती.

संपादकीय भूमिका

  • ‘भारतातील मुसलमानांचे प्राण संकटात आहेत’, अशी आवई उठवणार्‍यांना आता यावरून जाब विचारणे आवश्यक !
  • मध्यप्रदेशमध्ये भाजपचे शासन असतांना अशा प्रकारे धर्मांध मुसलमानांकडून धमकी दिली जाते, हे अपेक्षित नाही !