तब्बल ३५ रुपयांनी महागले पेट्रोल आणि डिझेल !
आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानात हाहा:कार !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – महागाईने पाकिस्तानी जनतेचे कंबरडे आधीच मोडले असतांना आर्थिक डबघाईला आलेल्या या जिहादी देशात आता पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. दोन्ही इंधनांची किंमत ३५ रुपयांनी वाढवण्यात आली आहे. देशाचे अर्थमंत्री इशाक डार यांनी २९ जानेवारीच्या सकाळी ही घोषणा केली. यामुळे आता जनतेला ‘दुचाकी आणि चारचाकी चालवायची कि नाही ?’, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भारताच्या तुलनेत हे दर अडीच पटींनी अधिक आहेत.
कंगाल पाकिस्तान में लोगों का निकला दिवाला, पेट्रोल-डीजल की कीमतों में 35 रुपये/लीटर का इजाफा https://t.co/Q9rUz29wDY
— Hindustan (@Live_Hindustan) January 29, 2023
पाकिस्तानातील इंधनांचे वाढलेले प्रति लिटर दर पुढीलप्रमाणे :
पेट्रोल : २४९.८० रुपये
हाय-स्पीड डिझेल : २६२.८० रुपये
साधारण डिझेल : १८७ रुपये
संपादकीय भूमिकाआर्थिक गणित इंधनांच्या मूल्यावर अवलंबून असल्याने आता पाकिस्तानने लवकरच दिवाळखोरी जाहीर नाही केली, तरच नवल म्हणावे लागेल ! |