ज्यांचा भारतात जन्म झाला, ते हिंदूच !
केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी सर सय्यद अहमद खान यांचे विधान केले उद्धृत !
नवी देहली – ज्याचा भारतात जन्म झाला आहे, ज्याने भारतातील अन्न खाल्ले आहे, ज्याने भारतातील नद्यांचे पाणी प्यायले आहे, त्या सर्वांना स्वतःला ‘हिंदु’ म्हणण्याचा अधिकार आहे आणि म्हणून ‘तुम्ही मला हिंदु म्हणावे’, असे विधान अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयाचे संस्थापक सर सय्यद अहमद खान यांनी काही दशकांपूर्वी आर्य समाजाच्या कार्यक्रमात केले होते. याची आठवण केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी एका कार्यक्रमात उपस्थितांना करवून दिली.
‘जो भारत में पैदा हुआ वो हिंदू, मुझे भी हिंदू कहिए’… सनातन पर ‘धर्मयुद्ध’ राज्यपाल Arif Mohammed Khan का बड़ा बयानhttps://t.co/feD0wxuTM3
— रिपब्लिक भारत (@Republic_Bharat) January 29, 2023
‘हिंदु’ ही भौगोलिक संज्ञा !
राज्यपाल आरिफ महंमद खान म्हणाले की, सर सय्यद खान यांनी वसाहतवादी राजवटीत विधान परिषदेतील कार्यकाळ पूर्ण केला, तेव्हा आर्य समाजाच्या सदस्यांनी त्यांचे स्वागत केले होते. सर सय्यद यांनी आर्य समाजाच्या सदस्यांना सांगितले होते, ‘तुम्ही मला ‘हिंदु’ का म्हणत नाही ? ‘हिंदु’ या शब्दाला मी धार्मिक संज्ञा मानत नाही, तर ‘हिंदु’ ही भौगोलिक संज्ञा आहे.’ (‘जो हीन गुणांचा नाश करतो, तो हिंदु’, जो हिंदु धर्मशास्त्र, चालीरिती, संस्कृती यांचे पालन करतो, तो ‘हिंदु’ आहे. ‘हिंदु’ नावाचा धर्मच अस्तित्वात नाही’, असे हिंदूंवर बिंबवून त्यांच्यात न्यूनगंड निर्माण करण्यासाठी असली वक्तव्ये कावेबाज मुसलमानांकडून केली जातात, हे लक्षात घ्या ! – संपादक)
संपादकीय भूमिकासर सय्यद अहमद खान यांनीच अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयाची स्थापना केली आहे आणि याच विश्वविद्यालयात हिंदुविरोधी कृत्ये केली जातात, हेही लक्षात घ्या ! |