रायपूर (जिल्हा नागपूर) येथे नियमित कर भरणार्या महिलेच्या हस्ते ध्वजारोहण !
नागपूर – रायपूर येथे नियमित कर भरणार्या एका महिलेच्या हस्ते ग्रामपंचायतीमध्ये २६ जानेवारीच्या दिवशी ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी तिचा सन्मानही करण्यात आला. श्रीमती कांता नगराळे असे त्या महिलेचे नाव आहे.
श्रीमती कांता नगराळे या व्यवसाय करतात. त्या नियमितपणे दुकानाचे भाडे आणि कर ग्रामपंचायतीत भरतात. ‘इतर व्यावसायिकांनी कांताबाईंप्रमाणे कर भरावा आणि ग्रामपंचायतीच्या महसुलात भर घालावी’, हा संदेश लोकांपर्यंत पोचवण्यासाठी सरपंच उमेश आंबटकर यांनी कांता नगराळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला.
संपादकीय भूमिकारायपूर ग्रामपंचायतीचा स्तुत्य निर्णय ! अन्य ग्रामपंचायतींनी असा आदर्श घ्यावा ! |