पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारी या दिवशी मुंबई दौर्यावर येणार !
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारी या दिवशी मुंबई दौर्यावर येणार आहेत. बोहरा मुसलमानांच्या एका कार्यक्रमासाठी ते उपस्थित रहाणार आहेत. यापूर्वी १९ जानेवारी या दिवशी पंतप्रधान मोदी मुंबई येथे आले होते. महानगरपालिकेच्या भविष्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचा मुंबई दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.