दारूसाठी मंदिरातून ३५ सहस्र रुपये चोरणार्या युवकाला अटक !
नागपूर – प्रवचन ऐकण्यासाठी येणार्या मुकेश उपाख्य मुक्कू गोपाल निहाय (वय २२ वर्षे) याने येथील पोद्दारेश्वर राम मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील ३५ सहस्र रुपये चोरून नेले. या प्रकरणी मंदिराचे विश्वस्त पुनीत पोद्दार यांनी तक्रार प्रविष्ट केल्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. सीसीटीव्हीच्या फुटेजवरूनही काहीच शोध लागला नाही; पण अन्वेषण करतांना पोलिसांना मुकेश नियमित मंदिरात येत असल्याची माहिती मिळाली. मुकेश विरुद्ध यापूर्वीही अनैसर्गिक कृत्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्याला संशयित म्हणून कह्यात घेण्यात आले. चौकशी केल्यावर त्याने चोरी केल्याचे मान्य केले. दारूच्या व्यसनासाठी त्याला पैशांची आवश्यकता असल्याने त्याने हे कृत्य केले.
संपादकीय भूमिकाअशांना कठोरात कठोर शिक्षाच करायला हवी ! |