सनातन संस्थेच्या कार्याची वस्तूनिष्ठ माहिती समाजापर्यंत पोचवण्यासाठी अद्ययावत माहितीचा आधार घ्या !
साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !
सनातनचे साधक, वाचक आणि हितचिंतक अध्यात्मप्रसार करण्याच्या उद्देशाने सनातनच्या कार्याची माहिती समाजापर्यंत पोचवण्यासाठी लग्नपत्रिका, स्वतःच्या उत्पादनाचे विज्ञापन करणार्या पिशव्या, आस्थापनाचे विज्ञापन करणारी दैनंदिनी (डायरी) आदींवर संस्थेची माहिती छापतात. ही सर्व माहिती नेहमीच्या संकेतस्थळावर ठेवलेली असते. संस्थेच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कार्याच्या अनुषंगाने ती सातत्याने अद्ययावतही होत असते. ही अद्ययावत माहिती सर्वांना कळावी आणि संस्थेचे कार्य वस्तूनिष्ठपणे समाजापर्यंत पोचावे, यासाठी पुढील माहिती प्रसिद्ध करत आहोत. साधक, वाचक आणि हितचिंतक यांनी प्रसार करतांना या माहितीतील आकडेवारीचा उपयोग करावा. ३१.१२.२०२२ पर्यंतची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.
अ. धर्मशिक्षण देणारी सनातन संस्था !
१. सनातन सांगत असलेल्या गुरुकृपायोग साधनामार्गानुसार एकूण १२२ साधक संत झाले, तर १ सहस्र ८७ साधकांचा प्रवास त्या दिशेने चालू आहे.
२. संस्थेद्वारे विनामूल्य सत्संग आणि बालसंस्कारवर्ग चालवले जातात.
आ. सनातनची अनमोल ग्रंथसंपदा !
१. आचारांमागील शास्त्र (२८ ग्रंथ)
२. धार्मिक आणि सामाजिक कृती (१३ ग्रंथ)
३. देवतांची उपासना आणि शास्त्र (४० ग्रंथ)
४. अध्यात्म आणि ईश्वरप्राप्तीसाठी साधना (१५१ ग्रंथ)
५. आयुर्वेद आणि पाल्याचे संगोपन (४९ ग्रंथ)
६. भाषाभिमान आणि भाषाशुद्धी (१० ग्रंथ)
७. धर्मजागृती (२१ ग्रंथ)
८. राष्ट्ररक्षण (१५ ग्रंथ)
९. बालसंस्कार (८ ग्रंथ)
१०. भावी संकटकाळातील संजीवनी ठरणारी ग्रंथमालिका (२५ ग्रंथ)
३६० ग्रंथ आणि लघुग्रंथ यांच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्ल्याळम्, बंगाली, ओडिया, आसामी, गुरुमुखी, सर्बियन, जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच आणि नेपाळी या १७ भाषांत ९२ लाख ११ सहस्र प्रती प्रकाशित !