पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील माहितीपट पडद्यावर दाखवण्यास विरोध !
भ्रमणसंगणकावर २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी माहितीपट पाहिला !
मुंबई – २० वर्षांपूर्वी झालेल्या गुजरात दंगलीच्या घटनेवर आधारित प्रदर्शित करण्यात आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील माहितीपट पडद्यावर दाखवण्यासाठी येथील ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’ने (‘टीस’ने) संस्थेच्या परिसरात माहितीपट दाखवल्यास कारवाई करण्याची चेतावणी आपल्याच विद्यार्थ्यांना दिली होती. भाजप युवा मोर्चानेही माहितीपट पहाण्यास विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी आपापल्या भ्रमणसंगणकावर (लॅपटॉपवर) माहितीपट पाहिला.
भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांचे म्हणणे होते की, सर्वाेच्च न्यायालयाने निर्णय देऊनही विदेशी प्रसारमाध्यमे मोदी यांना त्यात अडकवू पहात आहेत. न्यायालयाने बंदी घातलेला माहितीपट दाखवू नये.