तापामध्ये गुणकारी ‘सनातन त्रिभुवनकीर्ती रस (गोळ्या)’ आणि ‘सनातन मुस्ता (नागरमोथा) चूर्ण’
सनातनची आयुर्वेदाची औषधे
‘त्रिभुवनात कीर्ती पसरावी, एवढे ‘त्रिभुवनकीर्ती रस (गोळ्या)’ हे आयुर्वेदातील तापावरील प्रसिद्ध औषध आहे. ताप आल्यास आरंभी काही न खाता उपवास करावा. पुष्कळ भूक लागेल तेव्हा थोडासा गरम गरम वरणभात चमचाभर तूप घालून जेवावा आणि दिवसातून ३ वेळा ‘त्रिभुवनकीर्ती रस’ या औषधाची एकेक गोळी बारीक करून चहाचा पाव चमचा मध किंवा १ चमचा तुळशीचा रस यांत मिसळून चाटून खावी.
पिण्याच्या १ लिटर पाण्यामागे चहाचा अर्धा चमचा या प्रमाणात ‘सनातन मुस्ता (नागरमोथा) चूर्ण’ घालून पाणी उकळावे आणि गाळून थर्मासमध्ये भरून दिवसभर थोडे थोडे पीत रहावे. सर्व प्रकारच्या तापांवर हा आयुर्वेदाचा प्राथमिक उपचार आहे. याप्रमाणे केल्यास ताप हटकून बरा होतो; परंतु तरीही ३ दिवसांत गुण न आल्यास स्थानिक वैद्यांकडून उपचार घ्यावेत.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१२.२०२२)