अमेरिकेमध्ये पोलिसांकडून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केले शांततेचे आवाहन !
मेम्फिस (अमेरिका) – येथे २७ जानेवारी या दिवशी २९ वर्षीय अश्वेत तरुण टायर निकोल्स याला पोलिसांनी अमानुष मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणी संबंधित पोलिसांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे मारहाण करणारे पोलीसही अश्वेत आहेत. पोलिसांचा दावा आहे की, निकोल्स निष्काळजीपणाने चारचाकी गाडी चालवत होते. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.