उत्तरप्रदेशमध्ये भाजपच्या नेत्या असलेल्या मुसलमान महिलेला पतीने घरातून बाहेर काढले !
पती दुसरा विवाह करण्याच्या सिद्धतेत !
कानपूर – शहरातील भाजपच्या नेत्या आणि अल्पसंख्यक आयोगाच्या माजी सदस्या सोफिया अहमद यांनी त्यांचे पती शारिक अराफात हे दुसरा विवाह करण्याच्या सिद्धतेत आहेत, असा आरोप केला आहे. ‘हा विवाह रोखावा’, अशी मागणी सोफिया अहमद यांनी पोलिसांकडे केली आहे. शारिक आराफात यांनी मला तलाक न देताच घरातून बाहेर काढले आहे, असा आरोपही त्यांनी केला.
१. शारिक आराफात हे समाजवादी पक्षाचे ४ वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या गजाला लारी यांचे भाऊ आहेत. ‘मी भाजप पक्षाशी संबंधित आहे’, हे माझ्या सासरच्या मंडळींना पसंत नाही. ‘माझ्यावर भाजप सोडण्यासाठी दबाव आणला जात आहे’, असा आरोपी सोफिया यांनी केला आहे.
२. ‘गजाला लारी यांच्याकडून माझ्या जिवाला धोका आहे’, असा आरोपही सोफिया यांनी केला आहे.
३. सोफिया अहमद आणि शारिक आराफात यांचा वर्ष २०१५ मध्ये विवाह झाला होता. वर्ष २०१६ पासून त्यांच्यात खटके उडणे चालू झाले.
संपादकीय भूमिकामुसलमानांना कितीही चुचकारले किंवा त्यांच्यावर सुविधांची खैरात केली, तरी त्यांच्यातील भाजपद्वेष अल्प होणार नाही, हेच यातून दिसून येते ! |