भारत आणि चीन यांच्या सीमेवरील एकतर्फी कारवाईला आमचा विरोध ! – अमेरिका
वॉशिंग्टन (अमेरिका) – भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील कोणतीही एकतर्फी कारवाई आणि घुसखोरी यांचा आमचा विरोध आहे. आम्ही याकडे बारीक लक्ष ठेवून आहोत, असे विधान अमेरिकेचे उप प्रवक्ते वेदांत पटेल यांनी केले.
The United States (US) has said it opposes any “unilateral attempts” and incursions across the #LAC, days after Chinese President Xi Jinping met PLA soldiers stationed at the India-China border to “inspect combat readiness”.
(reports @prashantktm )https://t.co/Djm6dqMixY
— Hindustan Times (@htTweets) January 28, 2023
येथे एका पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी हे विधान केले. ‘भारत आणि चीन यांनी चर्चेद्वारे सीमावाद सोडवला पाहिजे’, असेही ते म्हणाले.