रतलाम (मध्यप्रदेश) येथे मुसलमानांकडून पुजार्‍याला घरात घुसून मारहाण !

मंदिरावरील भोंग्याचा आवाज अल्प करण्यास नकार दिल्याचे कारण

रतलाम (मध्यप्रदेश) – येथील दिवेल गावामध्ये हनुमान मंदिरावरील भोंग्यावर भक्तीगीते लावण्यात आली होती. त्या वेळी मुसलमानांकडून भोंग्याचा आवाज न्यून करण्यास सांगण्यात आल्यावरून झालेल्या वादानंतर मुसलमानांनी वृद्ध पुजारी रामचंद्र शर्मा यांच्या घरात घुसून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केली. याविषयीची माहिती हिंदुत्वनिष्ठ संघटनांना मिळाल्यावर ते घटनास्थळी पोचले. तोपर्यंत पोलीसही घटनास्थळी पोचले होते. येथे तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. सीसीटीव्हीच्या चित्रणाद्वारे आरोपींना पकडण्यात आले आहे. दिवेल गावामध्ये यापूर्वीही असा वाद झाला आहे. ‘येथे मंदिर आणि मशीद जवळच असल्याने नेहमीच वाद होत असतो’, असे लोकांनी सांगितले.

मशिदींवरील भोंग्यांचाही आवाज न्यून व्हावा ! – पुजार्‍यांनी केली होती मागणी

मुसलमान लोक पुजारी शर्मा यांना आवाज अल्प करायला सांगण्यासाठी गेले असता शर्मा यांनी ‘मशिदींवरील भोंग्यांवरून ऐकवण्यात येणार्‍या अजानचाही आवाज अल्प झाला पाहिजे’, अशी मागणी केली. या वेळी त्यांच्यात वाद झाला.

संपादकीय भूमिका 

भारतात गेली अनेक दशके मशिदींवरील भोंग्यांचा दिवसातून ५ वेळा होणारा आवाज हिंदू सहन करत आहेत, जर हिंदूंनी अशाच प्रकारे कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला असता, तर काय झाले असते, याचा विचार कुणी करील का ?