‘समर्थभक्‍त माधवराव गाडगीळ मित्र परिवारा’च्‍या वतीने महाशिवरात्र कीर्तन महोत्‍सवाचा संकल्‍प पार पडला !

हिंदु राष्‍ट्रासाठी प्रतिज्ञा घेतली

महाशिवरात्र कीर्तन महोत्‍सवाच्‍या निमित्त संकल्‍प घेतांना भाविक

मिरज (जिल्‍हा सांगली), २७ जानेवारी (वार्ता.) – येथील श्री काशी विश्‍वेश्‍वर मंदिरात महाशिवरात्रीच्‍या निमित्त कीर्तन महोत्‍सवाचा प्रारंभ रुद्राभिषेक, हिंदु राष्‍ट्रासाठी प्रतिज्ञा आणि संकल्‍प करून करण्‍यात आला. पुढील मासात १४ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत शिवलीलामृत पारायण, कीर्तन-प्रवचने, अखंड नामजप, आरोग्‍य पडताळणी शिबिर असे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्‍यात आले आहेत. या प्रसंगी सनातन संस्‍थेच्‍या वतीने श्रीमती सुरेखा आचार्य, श्री. किरण कुलकर्णी यांसह ६० जण उपस्‍थित होते.

‘समर्थ भक्‍त श्री. माधवराव गाडगीळ मित्र परिवारा’च्‍या वतीने आयोजित करण्‍यात आलेल्‍या कीर्तन महोत्‍सवात श्री. माधवराव गाडगीळ, वेणास्‍वामी मठाचे पू. कौस्‍तुभबुवा रामदासी, दासबोध अभ्‍यास मंडळाचे श्री. शामराव साखरे, आयुर्वेदाचार्य श्री. संदीप देवल, अस्‍थिरोगतज्ञ डॉ. उदय कुलकर्णी, सौ. मीनाताई गद्रे, श्री. राजाभाऊ माने, तसेच अन्‍य अनेक जण याच्‍या आयोजनात सहभागी आहेत.