गेवराई (बीड) येथे विक्रीसाठी आलेला २५ किलो गांजा जप्त !
गौसखान अमनउल्ला खान याला अटक
गेवराई (जिल्हा बीड) – शहराजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये विक्रीसाठी आणलेला २५ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी गौसखान अमनउल्ला खान याला अटक करण्यात आली आहे. २५ जानेवारीच्या मध्यरात्री पोलिसांनी ही कारवाई केली. गेवराई पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांना बाह्यवळण रस्त्याजवळील हॉटेलमध्ये २५ किलो गांजा विक्रीसाठी येत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. पोलिसांच्या पथकाने प्रत्यक्षात झडती घेतली असता २५ किलो गांजा विक्रीसाठी आल्याचे आढळून आले. (गांजाची विक्री करणार्यांची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत. – संपादक)