खामगाव (जिल्हा बुलढाणा) येथे ‘पठाण’ चित्रपटाचा फलक फाडला !
बुलढाणा – जिल्ह्यातील खामगाव शहरात अभिनेता शाहरूख खान याच्या ‘पठाण’ चित्रपटाला हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या रोषाला सामोरे जावे लागले. खामगाव येथील ‘सनी पॅलेस’ या चित्रपटगृहात लावण्यात आलेल्या ‘पठाण’ चित्रपटाचा फलक हिंदुत्वनिष्ठांनी फाडला, तसेच ‘अभिनेता शाहरूख खान मुर्दाबाद’च्या घोषणाही दिल्या. हिंदुत्वनिष्ठांनी चित्रपटगृहासमोर निदर्शने केली, तसेच विश्व हिंदु परिषद, बजरंग दल आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी ‘निषेध फेरी’ काढली. बजरंग दलाचे विदर्भ संयोजक अमोल अंधारे यांनी चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.