नागपूर येथे विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला अटक !
नागपूर – येथील इयत्ता ९ वीमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी विश्वास समुद्रे (वय २० वर्षे) याच्यावर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंद केला आहे. पीडित १६ वर्षीय मुलगी आणि आरोपी विश्वास यांच्यात जुनी ओळख आहे. जून २०२२ मध्ये मुलगी घरात एकटी असतांना विश्वास याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने वारंवार घरी येऊन तिच्यावर अत्याचार केला. मुलीची प्रकृती बिघडल्यावर तिला पालकांंनी आधुनिक वैद्यांकडे नेले. त्या वेळी ती मुलगी गर्भवती असल्याचे लक्षात येताच तिच्या आईवडिलांनी विचारपूस केल्यावर मुलीने सर्व माहिती त्यांना दिली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी विश्वास समुद्रे याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
संपादकीय भूमिकासमाजातील नैतिकता किती घसरली आहे, हे सांगणारी ही घटना ! |