क्षणभर दर्शन द्यावे गुरुराया ।
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
गुरुराया (टीप), वाटते मजला एक क्षण ।
भेटून जावे तुम्हा, आतुर होते माझे मन ॥ १ ॥
नाही मला काही बोलायचे वा सांगायचे ।
केवळ डोळ्यांत तुम्हाला साठवून घ्यायचे ॥ २ ॥
असता जरी तुम्ही चराचरी ।
पामर मी, वाटते मज तुम्ही दूरवरी ॥ ३ ॥
करावी मजवरी कृपा ।
क्षणभर दर्शन द्यावे गुरुराया ॥ ४ ॥
टीप : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले.
– सौ. स्वाती शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.१०.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |