भिवंडी न्यायालयातील लाचखोर लिपिक कह्यात !
ठाणे – भिवंडी न्यायालयात लिपिक म्हणून कार्यरत असलेला सरफराज शेख याला तक्रारदाराकडे ४ प्रकरणांवर ‘नंबरींग’ करून पुढील कार्यवाही करण्याकरता २ सहस्र रुपयांची लाच मागितली होती. अन्वेषणात लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने शेख याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले आहे. (अशा लाचखोरांवर कठोर कारवाई करून त्यांची सर्व संपत्ती जप्त केल्यासच इतरांवर जरब बसेल. – संपादक)