दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर कारवाई करा !
नागपूर येथे लहू सेनेची जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी !
नागपूर – एका ‘वेब सिरीज’मधील दृश्यात बँड पथकातील सदस्यांविषयी अभिनेते महेश मांजरेकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. याच्या निषेधार्थ स्थानिक लहू सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपजिल्हाधिकारी श्रीमती बनकर यांच्या माध्यमातून निवेदन पाठवून त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्याची मागणी २७ जानेवारी या दिवशी केली आहे.
एका वेबसिरीजमधील विवाह समारंभाच्या दृश्यात बँड पथकातील सदस्यांविषयी मांजरेकर यांच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद आहेत. हा प्रकार बँड पथकात वाद्य वाजवून उपजीविका करणार्यांचा अवमान आहे. वाद्य वाजवणे हा व्यवसाय आहे. विवाह समारंभासारख्या मंगल प्रसंगात त्यांना वाद्य वाजवण्यासाठी बोलावून कार्यक्रमाची शोभा वाढवली जाते; मात्र वेबसिरीजमधील दृश्यात बँड पथकाच्या संदर्भात मांजरेकर यांच्या तोंडी असलेल्या संवादाने महाराष्ट्रात हे काम करणार्यांना अल्प लेखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा आरोप लहू सेनेचे प्रमुख संजय कठाळे यांनी निवेदनात केला आहे.