हिंदु राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांच्यासह २० जणांची निर्दोष मुक्तता !
वर्ष २००९ मधील मोहसीन शेख हत्याप्रकरण
पुणे – येथील मोहसीन शेख हत्याप्रकरणी हिंदु राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांच्यासह सर्व २० आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. पुणे सत्र न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काही आक्षेपार्ह छायाचित्रे ‘फेसबूक’द्वारे प्रसारित केल्यामुळे २ जून २०१४ या दिवशी पुण्यातील हडपसर भागात दंगल झाली होती. त्या वेळी माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील अभियंता असलेला मोहसीन शेख याची जमावाने हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी हिंदु राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांच्यासह २३ जणांना येरवड्यातून अटक केली होती. वर्ष २०१९ मध्ये धनंजय देसाई यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन समंत केला होता.
A court in Pune Friday acquitted all accused persons, including Dhananjay Jayram Desai alias Bhai, the chief of the radical outfit Hindu Rashtra Sena (HRS), in a 2014 case of murder of 28-year-old Muslim techie Mohsin Shaikh.https://t.co/oj9nzjZU3z
— The Indian Express (@IndianExpress) January 27, 2023
संपादकीय भूमिकाया निर्दोष व्यक्तींना गेल्या ९ वर्षांत जे काही भोगावे लागले, त्याला उत्तरदायी कोण ? त्यांना झालेल्या मनस्तापाची भरपाई कधी होऊ शकेल का ? |