(म्हणे) ‘हिंदु राष्ट्र बनवणारे किती आले आणि किती गेले !’ – मौलाना तौकीर रझा
मौलाना तौकीर रझा यांचा पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या हिंदु राष्ट्राच्या विधानावर थयथयाट !
बरेली (उत्तरप्रदेश) – हिंदु राष्ट्र बनवणारे किती आले आणि किती गेले. आमच्या देशाला हिंदु राष्ट्र बनवले जाऊ शकत नाही. देशाची फाळणी झाली; मात्र हिंदु राष्ट्र बनू शकले नाही. हा श्रद्धेचा देश आहे. आमचा देश पुष्पगुच्छ असून त्यात सर्व रंगाची फुले आहेत, असे विधान येथील मौलाना तौकीर रझा यांनी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या भारताला हिंदु राष्ट्र बनवण्याच्या विधानावर केले आहे.
#OpinionIndiaKa: मौलाना तौकीर रजा ने बताया पंडित धीरेंद्र शास्त्री और #RSS का नया कनेक्शन @Anant_Tyagii के साथ देखिए, ‘ओपिनियन इंडिया का’ @himanshdxt #BageshwarDhamSarkar #BageshwarDham pic.twitter.com/GYZcaU2u8g
— Times Now Navbharat (@TNNavbharat) January 26, 2023
१. या वेळी मौलाना रझा यांनी पंतप्रधान मोदी यांना सध्याचे ‘भगवान’ असे संबोधले. यासह त्यांनी ‘जिना मुसलमान नव्हते. त्यांनी मुसलमान बनून भारताची फाळणी केली’, असा दावाही केला.
२. मौलाना रझा पुढे म्हणाले की, कुठल्याही मुसलमानाने गांधी यांची हत्या केली नाही, तर ती गोडसे याने केली. गांधी यांची हत्या हे संघाचे षड्यंत्र होते. संघाची योजना होती की, गांधी यांची हत्या झाली, तर मुसलमानांची कत्तल होईल. लोकांना वाटेल की, गांधी यांची हत्या मुसलमानाने केली आहे. संघाची योजना मुसलमानांनी निष्फळ ठरवली.
३. मौलाना रझा यांनी समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘रामचरितमानस’वर बंदी घालण्याच्या मागणीचेही समर्थन केले. ते म्हणाले की, ‘रामचरितमानस’मध्ये जे लिहिले आहे, तसेच आज घडत आहे. आज शुद्र, गांवढळ आदींना बडवले जात आहे, मुलींचे अपहरण होत आहे, त्यांचा अवमान होत आहे.
४. बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री धर्मांतरितांना पुन्हा हिंदु धर्मात आणण्याचे कार्य करत आहेत. यावर मौलाना रझा म्हणाले की, त्यांना लोकप्रिय व्हायचे आहे. यामुळेच ते अशा प्रकारचे कार्य करत आहेत. त्यांच्या जिवाला कोणताही धोका नाही.
संपादकीय भूमिका
|