अभिनेत्री उर्फी जावेद हिला मुंबईत भाड्याने घर देण्यास सर्वांचाच नकार !
मुंबई – अभिनेत्री उर्फी जावेद हिला मुंबईत रहाण्यासाठी भाड्याने घर हवे आहे; पण तिला कुणीही घर देत नाही, अशी माहिती तिने ट्वीट करून दिली आहे. तिने सांगितले, ‘‘माझ्या कपड्यांमुळे मुसलमान मालक मला घर भाड्याने देत नाहीत आणि मी मुसलमान आहे; म्हणून हिंदु मालक घर भाड्याने देत नाहीत. मला मिळणार्या राजकीय धमक्यांची काही मालकांना भीती वाटते. त्यामुळे मुंबईत भाड्याने जागा शोधणे अवघड आहे.’’ यावर सामाजिक माध्यमांवर काहींनी तिला सांगितले, ‘‘तू विचित्र कपडे घालण्याआधी या गोष्टींचा विचार करायला हवा होता.’’