एअर इंडियाच्या विमानात दारू देण्याच्या धोरणात पालट !
नवी देहली – एअर इंडियाने तिच्या विमानांमध्ये प्रवाशांना दारू वितरित करण्याच्या धोरणात पालट केला आहे. जे प्रवासी स्वतःसमवेत दारू घेऊन येतात त्यांच्याकडे सतर्कतेने लक्ष देण्यात येणार आहे. (वास्तविक विमानामध्ये दारूची बाटली नेऊन त्याचे सेवन करायचेच कशाला ? – संपादक) यासाठी विमानातील कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रवाशांनी अधिक दारूची मागणी केली, तर त्याला नकार देण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाने दारू पिऊन एका वृद्ध महिला प्रवाशावर लघुशंका केली होती.