…तिला आपण अंधश्रद्धा असे म्हणू शकत नाही !
‘अंधश्रद्धा’ या एका शब्दावरून आपल्याकडे नेहमी झोड उठवली जाते, तर कुणीतरी स्वतःला ‘अंधश्रद्धा निर्मूलक’ असे म्हणवतो. मुळात ‘अंधश्रद्धा’ हा शब्दप्रयोग योग्य आहे का ? याचा आपण विचार तरी केला आहे का ?’, असा प्रश्न सहजपणे मनात येतो. आपण मराठीचे अभिमानी असूनही चुकीचे मराठी शब्दप्रयोग अनेक वेळा करत असतो, हेसुद्धा या ‘सो कॉल्ड’ (तथाकथित) बुद्धीवादी लोकांच्या लक्षात येत नाही. श्रद्धा या शब्दातच आंधळेपणा हा अनुस्यूत (अध्यारूढ) आहे. श्रद्धेची पहिली अट आंधळेपणा हीच असते. भक्तीविषयीही तसेच म्हटले जाते. त्यामुळे ‘डोळस श्रद्धा’ आणि ‘अंधश्रद्धा’ असे काहीही प्रत्यक्षात अस्तित्वात नसते. जर चुकीच्या जागी एखाद्याची श्रद्धा असेल, तर त्याला आपण फार तर ‘विकृत श्रद्धा’ असे म्हणू शकतो; पण जिथे मूळ अटच आंधळेपणा आहे, तिला आपण अंधश्रद्धा असे म्हणू शकत नाही.’
– डॉ. सच्चिदानंद शेवडे, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते, डोंबिवली (२४.१.२०२३)