धर्मांधांच्या त्रासाला कंटाळून नगर येथे अल्पवयीन मुलीची आत्महत्या !
नगर – घरच्यांचा विरोध असतांना आपल्याशी लग्न कर, असा तगादा लावत रियाज चव्हाण येथील एका युवतीला मानसिक त्रास द्यायचा. या त्रासाला कंटाळून पीडितेने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नगर तालुक्यातील वाळुंज येथे ही घटना घडली असून नाशिक येथील आरोपी रियाज चव्हाण याच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आधी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती; मात्र अन्वेषणाच्या वेळी आरोपीचे नाव पुढे आल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.
संपादकिय भुमिका
|