संभाजीनगर येथे महानगरपालिकेची अनधिकृत केबलविरुद्ध धडक कारवाई !
१० सहस्र १७० मीटर केबल जप्त !
संभाजीनगर – महापालिकेच्या पथकाने २३ जानेवारी या दिवशी ३ विविध विभागांत कारवाई करून दिवसभरात तब्बल १० सहस्र १७० मीटर अनधिकृत केबल काढून जप्त केली आहे. या पथकात अतिक्रमण विभाग, विद्युत् विभाग आणि प्रभाग अधिकारी सहभागी झाले होते. झोन क्रमांक १, ४ आणि ७ मध्ये ही मोहीम राबवण्यात आली. विशेष म्हणजे ही मोहीम ३० जानेवारीपर्यंत चालणार आहे. महापालिका प्रशासनाने शहरात २८ नोव्हेंबर २०२२ पासून ४-५ दिवस विशेष मोहीम राबवून विद्युत् खांबांवरील अनधिकृत केबल्स हटवल्या होत्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने महापालिकेला विजेच्या खांबांवरील अनधिकृत केबल काढण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे.
संपादकिय भुमिका
|