जगभरातील अनेक देशांकडून भारताला प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा
कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) – भारताच्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्तान जगभरातील नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन भारताला प्रजासत्ताकदिनाच्या निमित्तान शुभेच्छा देतांना म्हणाले, ‘‘भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारी ही जगातील सर्वांत उत्पादक भागीदारीपैकी एक आहे.’’
भारतातील अमेरिकेच्या दूतावासाने व्हिडिओ बनवून अभिनंदन केले आहे. या व्हिडिओमध्ये राघवन आणि स्टेफनी हे २ अमेरिकी अधिकारी भारतीय गायिका पवित्रा चारी यांच्या समवेत ‘वन्दे मातरम्’ गातांना दिसत आहेत.
अमेरिका, ब्रिटेन, ऑस्ट्रेलिया, इजरायल… 73वें गणतंत्र दिवस पर दुनियाभर के देशों ने भेजे शुभकामना संदेश #73rdrepublicday #america #australia #bhutan #indian #अमेरिका #गणतंत्रदिवस #मोदी #शुभकामना https://t.co/95hcFeyv0l
— Punjab Kesari (@PunjabKesariCom) January 26, 2023
ऑस्ट्रेलियातील नागरिक आणि येथे रहाणारे भारतीय यांना एकत्र येण्याची संधी ! – ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनीही भारताला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ‘‘हा दिवस भारताची संस्कृती आणि कर्तृत्व यांचा आदर करण्याचा क्षण आहे. ऑस्ट्रेलियातील नागरिक आणि येथे रहाणारे भारतीय यांना एकत्र येण्याची ही संधी आहे. मी सर्वांना शुभेच्छा देतो.
भारतात लोकशाही जिवंत ! – मालदीवचे परराष्ट्रमंत्री
मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद म्हणाले की, भारतीय लोकशाही केवळ जिवंत नाही, तर तिचा भरभराट होत आहे. आम्ही भारताला शांतता, प्रगती आणि समृद्धी यांसाठी शुभेच्छा देतो.