‘उडाण’ अंतर्गत मिरज येथील कवलापूरमध्येच विमानतळ करा ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप
सांगली – मिरज तालुक्यातील कवलापूर येथे विमानतळासाठी १६० एकर जागा आरक्षित आहे. या जागेवर पूर्वी धावपट्टी होती. कवलापूर येथे विमानतळाच्या जागेसाठी आरक्षण झाल्यास जिल्ह्याच्या कृषी आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल. तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘उडाण’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत या जागेवरच विमानतळ विकसित करावे, अशा मागणीचे निवेदन भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
'उडान' योजनेतून कवलापूर विमानतळ होण्यासाठी प्रयत्न.आमदार @SudhirGadgil यांनी घेतली @mieknathshinde व @Dev_Fadnavis यांची भेट. उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांना प्रस्ताव तातडीने तपासून सादर करण्याचे आदेश. ✈️👍 pic.twitter.com/kmVU3l4adD
— Sangli (@ProudSanglikar) January 25, 2023
या वेळी मुख्यमंत्र्यांनी उद्योग विभागाचे प्रधान सचिव यांना हा प्रस्ताव तातडीने पडताळून त्या संदर्भात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.