राजापूर (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनचे ७८ वे संत पू. चंद्रसेन मयेकर (वय ८६ वर्षे) यांचा देहत्याग !
राजापूर, २५ जानेवारी (वार्ता.) – येथील सनातनचे ७८ वे संत पू. चंद्रसेन मयेकर (वय ८६ वर्षे) यांनी २५ जानेवारी (श्री गणेश जयंती) या दिवशी दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी रहात्या घरी देहत्याग केला. ते गेले काही मास रुग्णाईत होते. पू. मयेकरकाका सेवानिवृत्त ग्रामसेवक होते. सेवानिवृत्तीनंतर वर्ष १९९९ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार ते साधना करत होते.
दैनिक ‘सनातन प्रभात’ची रत्नागिरी आवृत्ती चालू झाल्यापासून त्यांनी शहरातील दैनिक ‘सनातन प्रभात’ वितरणाच्या सेवेचे दायित्व पाहिले. दैनिक वितरण, गुरुपौर्णिमा महोत्सवात प्रासंगिक सेवेत ते सहभागी होत. दैनिक वितरणाची सेवा करतांनाच त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आणि २९.७.२०१८ या दिवशी संतपद प्राप्त केले.
त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा श्री. महेश मयेकर, नातू श्री. प्रतीक मयेकर, तसेच २ भाऊ, १ विवाहित बहीण, पुतणे, पुतण्या आणि १ सून असा परिवार आहे.