रांची येथील मंदिरातील शिवलिंगाची अज्ञातांकडून तोडफोड !
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
रांची (झारखंड) – येथील अपर बाजारातील रंगरेज गल्लीमध्ये असणार्या मंदिरातील शिवलिंगाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आल्याने येथे तणाव निर्माण झाला आहे. लोकांनी येथील सर्व दुकाने बंद केली. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निदर्शने करत आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी या घटनेची चौकशी चालू केली आहे.
मंदिराजवळील मदरशांच्या मौलवींच्या आदेशाने तोडफोड होत असल्याचा आरोप
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, पूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. आम्हाला संशय आहे की, मंदिरापासून काही अंतरावर असणार्या मदरशातील मौलवीच्या (इस्लामच्या धार्मिक नेत्याच्या) आदेशाने ही तोडफोड केली जात असावी.
संपादकीय भूमिकाझारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सरकार असल्याने तेथे सातत्याने हिंदुविरोधी घटना घडत आहेत. हिंदूंनी संघटित होऊन सरकारला धडा शिकवणे आवश्यक आहे, तेव्हाच अशा घटना थांबतील ! |