चित्रपटात आक्षेपार्ह आढळल्यास विरोध करणार !
‘पठाण’ चित्रपटाविषयी विश्व हिंदु परिषदेची भूमिका !
नवी देहली – अभिनेते शाहरूख खान यांचा ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यातून भगव्या रंगाच्या झालेल्या अवमानावरून त्याला हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी चित्रपटाला थेट विरोध करणार नसल्याचे म्हटले आहे.
पठान फिल्म को विश्व हिंदू परिषद का विरोध नहीं ,
विश्व हिंदू परिषद के प्रवक्ता श्रीराज नायर @snshriraj ने कहा कि आपत्तिजनक सीन को हटाने के बाद #VHP का विरोध नहीं #Pathan #PathanMovie @SRKFC_PUNE @iamsrk @deepikapadukone @VHPDigital pic.twitter.com/umNbGhVmlG— Abhishek Pandey – अभिषेक पाण्डेय (@abhishekpandey2) January 25, 2023
१. विश्व हिंदु परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर यांनी सांगितले की, सध्या तरी विश्व हिंदु परिषद पठाण चित्रपटला विरोध करणार नाही. आमचे पूर्वीचे आक्षेप लक्षात घेऊन चित्रपटात केलेले पालट योग्य आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर आम्हाला काही आक्षेपार्ह वाटले, तर आम्ही चित्रपटाला विरोध करण्याचा पुनर्विचार करू.
२. हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून भगवा रंग आणि काही वाक्य यांवर आक्षेप घेतल्यानंतर केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने चित्रपट निर्मार्त्यांना काही पालट सुचवल्यानंतर तो प्रदर्शित करण्यात आला आहे.