‘दशम अखिल भारतीय राष्ट्रीय अधिवेशना’च्या निमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेल्या संदेशानुसार अधिवेशनाच्या आधीपासूनच साधक अनुभवत असलेली श्री भवानीदेवीची कृपा !
‘१२ ते १८.६.२०२२ या कालावधीत ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले होते.
१. ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या आधी काही दिवसांपासून श्री भवानीदेवीची आठवण येणे
मला ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या ८ ते १० दिवस आधीपासून आई श्री भवानीदेवीची सारखी आठवण येत होती. मी सकाळी डोंगरावर फिरायला गेल्यावर परिसरातील सर्व डोंगरांमध्ये ‘आई भवानीदेवीचे अस्तित्व आहे’, असे मला जाणवत होते. माझ्या मनात ‘देवीची शक्ती कार्यरत असल्यानेच जगाचे व्यवहार चालू आहेत’, असा विचार येऊन मला देवीची तीव्रतेने आठवण यायची.
२. आई श्री भवानीदेवीला सतत प्रार्थना होणे
मी डोंगरावरून घरी परत येतांना मी संबळाच्या (एक चर्मवाद्य. देवीच्या गोंधळात गोंधळी हे वाद्य वाजवतात.) तालावर वाजणारी देवीची गाणी ऐकत येतो. ती गाणी ऐकत असतांना माझी भावजागृती होत असे. माझ्याकडून देवीला अनेक वेळा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आरोग्य चांगले राहू दे आणि सर्व साधकांवर मायेची पाखर घाल’, अशी आर्तभावाने प्रार्थना होत असे.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या’ निमित्त आलेला संदेश वाचल्यावर देवीची अनुभवत असलेली कृपा लक्षात येणे
‘असे का होत आहे ?’, ते मला कळत नव्हते. तेव्हा माझ्या मनात ‘आता देवीची उपासना करायला सांगतील’, असा विचार येत होता. १२.६.२०२२ या दिवशी म्हणजे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या’ निमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेल्या संदेशात वाचले, ‘शक्तीची उपासना करा आणि उपासनेची शक्ती वाढवा.’ तेव्हा मी अनुभवत असलेली श्री भवानीदेवीची कृपा माझ्या लक्षात आली.’
– गुरुसेवक,
श्री. विजय पाटील, भोर, पुणे. (२.१०.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |