चित्रपट दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांची मुंबई पोलिसांकडे अतिरिक्त सुरक्षेची मागणी !
मुंबई – चित्रपट दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी मुंबईचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण यांना पत्र लिहून अतिरिक्त सुरक्षेची मागणी केली आहे. संतोषी यांचा ‘गांधी-गोडसे : एक युद्ध’ २६ जानेवारी या दिवशी प्रसारित होणार आहे. या चित्रपटाचे प्रसारण रहित करा, अन्यथा परिणाम वाईट होईल, अशी धमकी मिळाल्याचे राजकुमार संतोषी यांनी पत्रात म्हटले आहे.
#RajkumarSantoshi claims ‘receiving threats’ ahead of #GandhiGodseEkYudh release, files complaint with Mumbai Police seeking security.https://t.co/kBoE35JNZp
— India TV (@indiatvnews) January 24, 2023
२० जानेवारी या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही युवकांनी गोंधळ घालून पत्रकार परिषद बंद पाडली. यानंतर मुंबई पोलिसांकडून राजकुमार संतोषी यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यानंतर धमकीचे दूरभाष आल्यामुळे राजकुमार संतोषी यांनी अतिरिक्त सुरक्षेची मागणी केली आहे. धमकी देणार्यांकडून स्वत:च्या कुटुंबियांनाही धोका असल्याचे संतोषी यांनी तक्रारीत म्हटले आहे. याविषयी २३ जानेवारी या दिवशी संतोषी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.