‘धर्मवीर’ शब्दावरून विनाकारण राजकारण होत आहे ! – माजी खासदार संभाजीराजे
पुणे – अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजी महाराज ‘धर्मवीर’ कि ‘स्वराज्यरक्षक’ या मुद्यावरून सध्या वाद चालू आहे; मात्र आपण आता याच्या पलीकडे जाण्याची आवश्यकता आहे. या काही जुन्या पदव्या नाहीत, तर लोकांनी दिलेल्या उपाध्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकार कोणतीच भूमिका मांडतांना दिसत नाही. गडांचे संवर्धन केले पाहिजे. त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आलेल्यांनी राज्यातील गड-कोट आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक आदी प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली.