लंडनमधील चर्चमध्ये ‘सेक्स पार्टी’ आयोजित करण्यात आल्याचे उघड !
|
लंडन (ब्रिटन) – कोरोनाच्या दळणवळण बंदीच्या काळात येथील एका चर्चमध्ये शारीरिक संबंध ठेवण्याची पार्टी (‘सेक्स पार्टी’) आयोजित करण्यात आल्याची माहिती उघड झाल्यानंतर ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु फ्रान्सिस पोप याच्या आदेशानुसार व्हॅटिकनकडून या प्रकरणाची चौकशी चालू करण्यात आली आहे. लिव्हरपूलचे आर्चबिशप हे या प्रकरणाची चौकशी करत आहेत. हेक्हम आणि न्यूकास्टले येथील माजी बिशप रॉबर्ट बयर्ने यांच्या त्यागपत्राची चौकशी चालू असतांना हे प्रकरण समोर आले. (चर्चमध्ये वरच्या श्रेणीत कार्यरत असलेल्या पाद्रयांना ‘बिशप’ म्हणतात, तर ‘बिशप’च्या वर कार्यरत असणार्यांना ‘आर्चबिशप’ म्हणतात.)
Vatican Orders Probe Against Late Pastor Michael McCoy for Organising 'Sex Party' in Empty Cathedral During Lockdown#Vatican #PastorMichaelMcCoy #SexParty #LondonChurch #Lockdownhttps://t.co/mnP6fcZsfB
— LatestLY (@latestly) January 24, 2023
या सेक्स पार्टीचे आयोजन ५७ वर्षीय पाद्री मायकल मॅककॉय याने कोरोनाच्या दळणवळण बंदीच्या काळात बंद असलेल्या चर्चमध्ये केले होते. विशेष म्हणजे वर्ष २०२१ मध्ये मॅककॉय याने आत्महत्या केली आहे. त्याच्या विरोधात पोलिसांनी बालकांचे लैंगिक शोषण केल्याची चौकशी चालू झाल्यावर त्याने आत्महत्या केली. मॅककॉय याने सेक्स पार्टी आयोजित केल्याची माहिती समोर आल्यानंतर अनेक लोक त्याच्या विरोधात साक्ष देण्यासाठी समोर आले आहेत.
संपादकीय भूमिका
|