कुलगुरु आणि संशोधक यांना जेवणासाठी १ घंटा ताटकळत रहावे लागले !
‘इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस’मधील प्रकार !
नागपूर – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाच्या शैक्षणिक परिसरात चालू असलेल्या ७२ व्या ‘इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस’मध्ये २१ जानेवारी या दिवशी दुपारी जेवणाच्या दालनासमोर अनेक विद्यापिठांचे कुलगुरु आणि संशोधक यांना ताटकळत उभे रहावे लागले. जेवणाच्या ठिकाणी अन्नाचा अपुरा पुरवठा आणि झालेली गर्दी सांभाळणे आयोजकांना कठीण झाल्याने मान्यवरांनी खेद व्यक्त केला.
‘इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस’चे २१ जानेवारी या दिवशी उद़्घाटन झाले. अतिथींसाठी जेवण नोंदणी आधीच झाली असतांनाही अंदाज न आल्याने २२ जानेवारी या दिवशीही असाच प्रकार घडला.
संपादकीय भूमिकामान्यवर येणार असतांनाही त्यांचे सुनियोजन न करता सावळा-गोंधळ चालू देणे लज्जास्पद ! |