लातूर येथील बालगृहातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार !
५ जणांविरुद्ध गुन्हा नोंद
लातूर – येथील महिला आणि बालविकास विभागाच्या बालगृहातील अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतर लातूर एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात मुलीच्या मैत्रिणीसह ५ जणांविरुद्ध भारतीय दंड विधान आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील एका महिलेला अटकही करण्यात आली आहे. बालगृहातील ही मुलगी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती.
मैत्रिणींसमवेत पार्टीला जाण्याचे ठरल्यावर संबंधित मैत्रिणीने तिच्या पतीला बोलावून घेतले. मैत्रिणीचा पती रिक्शा घेऊन आला. रिक्शाचालकासह ५ जण अंबाजोगाई मार्गावरील शेतात गेले. रिक्शाचालक पीडितेला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार करू लागला. पीडितेने विरोध केला असता तिला मारून टाकण्याची धमकी दिली. यातच मुलीला गुंगी आली. जेव्हा तिला शुद्ध आली, तेव्हा ती बालगृहात होती.
संपादकीय भूमिकामहिलांसाठी असुरक्षित महाराष्ट्र ! |