नाशिक येथे २०० साधकांकडून १०८ सूर्यनमस्कार !
नाशिक – सातपूर येथील मुक्ती महिला संस्था आणि श्रीराम फाऊंडेशन यांच्या वतीने २२ जानेवारी या दिवशी ‘सूर्याथॉन-२०२३’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अनुमाने २०० योग साधकांच्या वतीने १०८ सूर्यनमस्कार करण्यात आले. समवेतच हास्ययोग, तसेच विविध योगांचे प्रात्यक्षिकही या वेळी करण्यात आले. योग प्रशिक्षक म्हणून महिला पतंजली समितीच्या योग प्रशिक्षक चारूलता शिरसाठ, कविता पाटील, पूनम भारद्वाज, डॉ. मेघा वाणी यांनी दायित्व पार पाडले.
कार्यक्रमात सहभागी योग साधकांना यशस्वी सहभागाविषयी पदक देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमास प्रगती शाळेच्या विद्यार्थ्यांनी लक्षणीय सहभाग नोंदवला.