भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची आवश्यकता ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री
रायपूर (छत्तीसगड) – भारत एक हिंदु राष्ट्र आहे असून तशी घोषणा करणे आवश्यक आहे, असे उत्तर येथील बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिले.
१. या मुलाखतीत पत्रकाराने धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना ‘तुमचे लक्ष्य काय आहे ?’, असा प्रश्न विचारला. त्यावर धीरेंद्रकृष्ण शास्त्री म्हणाले, ‘‘माझे लक्ष्य केवळ सनातन आहे.’’ त्यावर पत्रकाराने विचारले, ‘भारत हिंदु राष्ट्र बनत आहे, हे ऐकून लोक घाबरतील.’ त्यावर शास्त्री म्हणाले, ‘मी त्यांचे ध्येय उधळून लावत आहे, याचीच त्यांना भीती आहे. जर आपण हिंदु राष्ट्र बनवू शकलो नाही, तर काय ? क्रांती तर होईल.’
तुम मेरा साथ दो मैं तुम्हें हिंदू राष्ट्र दूँगा… सुभाष चंद्र बॉस के जन्मदिन पर कही बड़ी बात…https://t.co/t0wtxsW6KK#bageshwardhamsarkar #bageshwardham
— Bageshwar Dham Sarkar (Official) (@bageshwardham) January 23, 2023
२. ‘तुमच्या हिंदु राष्ट्राची कल्पना काय आहे. यात मुसलमान, शीख, ख्रिस्ती असतील का ?’ या प्रश्नाच्या उत्तरात धीरेंद्रकृष्ण शास्त्री म्हणाले की, आमचे लक्ष्य ‘रामराज्य स्थापन करणे’, हे आहे.