अंदमान-निकोबारमधील २१ बेटांना ‘परमवीर चक्र’ मिळवलेल्या सैनिकांची नावे !
नवी देहली – केंद्रशासनाकडून अंदमान-निकोबारमधील २१ बेटांना ‘परमवीर चक्र’ मिळवलेल्या सैनिक आणि सैन्याधिकारी यांची नावे देण्यात आली आहेत.
Naming of 21 islands of Andaman & Nicobar Islands after Param Vir Chakra awardees fills heart of every Indian with pride. https://t.co/tKPawExxMT
— Narendra Modi (@narendramodi) January 23, 2023
यात १९४७, १९६२, १९७१ आणि १९९९ या वर्षी झालेल्या पाकविरुद्धच्या युद्धात, तर वर्ष १९६५ मध्ये झालेल्या चीनविरुद्धच्या युद्धात शौर्य गाजवणारे भारतीय सैनिक आणि अधिकारी यांच्यासह वर्ष १९८७ मध्ये श्रीलंकेत ‘शांतीसेना’ म्हणून गेलेल्या सैनिकांचाही समावेश आहे. यात मेजर राणे, मेजर शैतान सिंह, कारगिल युद्धातील कॅप्टन विक्रम बत्रा आदींचा समावेश आहे.