आसाम येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते शंभू कैरी यांची हत्या करणार्यांना कठोर शिक्षा द्यावी ! – बजरंग दलाचे निवेदन
सांगली – ८ जानेवारीला बजरंग दलाचे आसाम येथील कार्यकर्ते शंभू कैरी यांची हत्या करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून अशाच पद्धतीने अनेक हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. ‘पी.एफ्.आय्.’, ‘सिमी’ यांसह अनेक नावे घेऊन अनेक आतंकवादी गट कार्यरत आहेत. अशा आतंकवादी कारवाया करणार्यांना प्रोत्साहन देणारे संबंधित देशद्रोही आणि आतंकवादाची केंद्रे यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच हिंदूंच्या हत्या करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना बजरंग दलाच्या वतीने देण्यात आले.
या प्रसंगी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री. आकाश जाधव, मिरज तालुका संयोजक श्री. परशुराम नाईक, सर्वश्री कौस्तुभ गुरव, सागर कुंभार, संतोष राहापुरकर, सौरभ मोहिते, सार्थक गोसावी, निखिल सौंदडे उपस्थित होते. याच मागणीचे निवेदन जत, पलूस, तासगाव येथेही देण्यात आले.