मुंबईत दीड वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करणार्या नराधमाला अटक !
मुंबई – वरळी येथील दीड वर्षांच्या बालिकेवर परिसरातीलच एका ३५ वर्षीय नराधमाने बलात्कार केला. बालिकेच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून वरळी पोलीस ठाण्यात ‘पॉक्सो’ कायद्यांर्तगत गुन्हा नोंदवण्यात आला असून अत्याचारी व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
35-year old neighbour raped a baby aged just over one and a half years, in #Mumbai when her parents were out#Rape #GirlChild #CrimesAgainstChildren #crime https://t.co/Oa9JYvMNfq
— Jagran English (@JagranEnglish) January 23, 2023
बालिकेची आई घराबाहेर गेली असतांना आरोपीने तिला स्वत:च्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने मुलीला तिच्या घराबाहेर सोडले. मुलगी पुष्कळ रडत होती. तिला काही सांगताही येत नसल्याने तिच्या आईला कळत नव्हते. आईला संशय आल्याने तिला मुलीला रुग्णालयामध्ये नेल्यावर आधुनिक वैद्यांनी मुलीवर अत्याचार झाल्याचे सांगितले. यानंतर पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
संपादकीय भूमिकासमाजातील वाढती वासनांधता ! सरकारने वासनांधांना फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न केले, तरच असे कुकृत्य करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही ! |