(म्हणे) ‘पंतप्रधानांच्या विरोधातील माहितीपटावर बंदी घातली जाते; मात्र गोडसेवरील चित्रपटावर नाही !’ – असदुद्दीन ओवैसी

असदुद्दीन ओवैसी यांचा नाहक प्रश्‍न !

भाग्यनगर (तेलंगाणा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ते गुजरातचे मुख्यमंत्री असतांना झालेल्या दंगलीवरून ‘बीबीसी न्यूज’ने माहितीपट बनवला होता. त्यावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. आता म. गांधी यांची हत्या करणार्‍या गोडसे याच्यावर चित्रपट बनवण्यात आला आहे. त्यावर पंतप्रधान बंदी घालणार का ? मी हा चित्रपट पाहिला आहे. त्यात गोडसे, ‘गांधी यांना का मारले’, ते सांगतो. मोदी यांच्या विरोधातील माहितीपटाविषयी अडचण आहे; मात्र गांधींची हत्या करणार्‍या चित्रपटावर अडचण नाही, अशी टीका एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. येत्या २६ जानेवारीला ‘गांधी-गोडसे : एक युद्ध’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

संपादकीय भूमिका

  • जे खोटे आहे त्यावर बंदी घातलीच पाहिजे आणि जे सत्य आहे, ते जगासमोर मांडलेच पाहिजे ! याच्या उलट जर ओवैसी मागणी करत असतील, तर ते कसे मान्य करता येणार ?
  • ‘द कश्मीर फाइल्स चित्रपटालाही ओवैसी यांनी विरोध केला होता; कारण तो हिंदूंची खरी बाजू सांगत होता, हे लक्षात घ्या !