शाळेची सहल घेऊन जाणार्या बसचा पुणे-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर अपघात !
कराड, २२ जानेवारी (वार्ता.) – येथील पुणे-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर शाळेची सहल घेऊन जाणार्या एस्.टी. बस आणि कंटेनर यांचा अपघात झाला असून ३ विद्यार्थ्यांसह २ शिक्षक किरकोळ, तर एक शिक्षक गंभीर घायाळ झाले आहेत. जखमींना कराड आणि सातारा येथील रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. वाघोली येथील भारत विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाची सहल कोकण दर्शन करण्यासाठी गेली होती. बसमध्ये ४० विद्यार्थ्यांसह काही शिक्षक होते.